स्वागत

मराठी दिनदर्शिकेच्या या मुख्य पानावर आपले सहर्ष स्वागत आहे!

या वर्षीची, म्हणजे शके १९४८ (२०२६-२७) दिनदर्शिका ही वेगवेगळ्या स्वरूपात उपलब्ध आहे. आपल्याला खालील कोणत्याही स्वरूपातील दिनदर्शिका विकत घ्यायची असल्यास कृपया ९३५६३४५९०९ या क्रमांकावर whatsapp वर संपर्क करावा.

कृपया नोंद घ्यावी की ही दिनदर्शिका मराठी वर्षाप्रमाणे असल्यामुळे चैत्र ते फाल्गुन अशा महिन्यांची आहे. पुढील मराठी वर्ष हे इ.स. २०२६ मधील १९ मार्च रोजी चालू होत असल्यामुळे दिनदर्शिकांची छपाई साधारण जानेवारी २०२६ मध्ये होईल आणि फेब्रुवारी पर्यंत वितरण होईल. डिसेंबर २०२५ पर्यंत नोंद केल्यास आणि पैसे भरल्यास दिनदर्शिका सवलतीच्या किमतीत (छपाई झाल्यावर) मिळेल.

भिंतीवरची दिनदर्शिका
भिंतीवर लावण्यास उपयुक्त. प्रत्येक तिथीबद्दल विस्तृत माहिती असल्यामुळे अतिशय उपयोगी.
आकार: A3
माहिती: विस्तृत
टेबलावरची दिनदर्शिका
घरी अथवा ऑफिस मध्ये टेबलावर, डेस्क वर ठेवण्यास उपयुक्त. महत्वाचे सण आणि तिथींची माहिती.
आकार: 7 x 9.5 inch
माहिती: संक्षिप्त
दैनंदिनी स्वरूपातील दिनदर्शिका
सर्व माहिती सकट प्रत्येक दिवसासाठी एक पान. दैनंदिनी (वही) स्वरूपात असल्यामुळे रोजची दैनंदिनी लिहिण्यास अतिशय उपयुक्त. वरील दोन्ही प्रकारात उपलब्ध नसलेल्या काही महत्वाच्या सूचनांचा अंतर्भाव. 
आकार:A5
माहिती: संक्षिप्त

प्रश्नोत्तरे:

प्रश्न १. मराठी दिनदर्शिका म्हणजे काय?
उत्तर १: इंग्रजी दिनदर्शिका ही जानेवारी महिन्यात चालू होऊन डिसेंबर महिन्यात संपते. परंतु भारतीय हिंदू दिनदर्शिका या चैत्र महिन्यात चालू होऊन फाल्गुन महिन्यात संपतात. ही दिनदर्शिका भारतीय हिंदू दिनदर्शिका आहे. मराठी दिनदर्शिकेतील प्रत्येक महिना २ भागात विभागलेला आहे. पहिला भाग शुद्ध पक्ष आणि दूसरा कृष्ण पक्ष. पहिल्या भागात प्रतिपदा ते पौर्णिमा आणि दुसऱ्या भागात प्रतिपदा ते अमावस्या अशा तिथी आहेत.

प्रश्न २: या मराठी दिनदर्शिकेत इंग्रजी महिन्याच्या तारखा कळतात का?
उत्तर २: ही दिनदर्शिका मराठी असली तरी तारखांप्रमाणे याची रचना आहे, त्यामुळे इंग्रजी महिन्यांच्या तारखा ठळक पणे दिलेल्या आहेत.

प्रश्न ३: या दिनदर्शिकेतील सर्व वेळा कुठल्या ठिकाणाप्रमाणे आहेत?
उत्तर ३: या दिनदर्शिकेतील सर्व वेळा (सूर्योदय-सूर्यास्त, चंद्रोदय-चंद्रास्त, नक्षत्र समाप्ती, पौर्णिमा-अमावस्या आरंभ आणि समाप्ती) या पुणे शहाराप्रमाणे आहेत.

प्रश्न ४: ही दिनदर्शिका कशी विकत घ्यायची? पैसे कुठे आणि कधी भरायचे ? कशी आणि कधी मिळेल?
उत्तर ४: ही दिनदर्शिका विकत घेण्यासाठी ९३५६३४५९०९ या नंबर वर whatsapp मेसेज करावा. डिसेंबर २०२५ च्या आत पैसे भरल्यास सवलत मिळेल (वर दर लिहिले आहेत). पैसे पाठवण्यासाठी amitchitale@icici हा upi id वापरावा. पैसे पाठवल्यानंतर ९३५६३४५९०९ या नंबर वर screenshot पाठवावा. दिनदर्शिकांची छपाई साधारण जानेवारी २०२६ मध्ये होईल. आणि फेब्रुवारी पर्यंत वितरण चालू होईल. पुण्यात कोथरूड भागात घरपोच मिळेल, त्या पेक्षा लांब असेल तर पोस्टाने (speed post) पाठवली जाईल. पोस्टेज आकार अतिरिक्त पडेल.

या दिनदर्शिकेच्या अनुषंगाने भारतीय सणवार, भारतीय कालगणना, भारतीय कालगणना आणि पाश्चात्य कालगणनेतला फरक, ऋतुनुसार आचार विचार अशा गोष्टी इथे लवकरच बघायला मिळतील.


- अमित चितळे (९३५६३४५९०९)
chitale.amit@gmail.com