स्वागत

मराठी दिनदर्शिका विकत कशी घ्यावी

या वर्षीची, म्हणजे शके १९४८ (२०२६-२७) दिनदर्शिका विकत घ्यायची असल्यास कृपया ९३५६३४५९०९ या क्रमांकावर whatsapp वर संपर्क करावा.

कृपया नोंद घ्यावी की ही दिनदर्शिका ग्रेगोरियन म्हणजे जानेवारी ते डिसेंबर नसून, मराठी वर्षाप्रमाणे असल्यामुळे चैत्र ते फाल्गुन अशा महिन्यांची आहे. पुढील मराठी वर्ष हे इ.स. २०२६ मधील १९ मार्च रोजी चालू होत असल्यामुळे वितरण गुढीपाडव्या पर्यंत चालू राहील.

मराठी दिनदर्शिकेसंबंधी थोडेसे

हजारो वर्षांपूर्वी आपल्या ऋषिमुनींनी खगोल शास्त्राचा प्रदीर्घ अभ्यास करून आणि अनुभवाच्या आधारे कालगणना नियमित केली. हे एकदम एका वेळी झालं नाही. निरीक्षण करत करत अनेक पिढ्या अभ्यास करत शेवटी हे तयार झालं.

सूर्याभोवती एक संपूर्ण प्रदक्षिणा पूर्ण करायला पृथ्वीला ३६५.२५ दिवस लागतात. या संपूर्ण वर्षामध्ये, पृथ्वीच्या कललेल्या आसामुळे, वेगवेगळा भाग जास्त किंवा कमी प्रमाणात सूर्यासमोर येतो. यामुळे आपल्याला वर्षात सहा वेगवेगळे ऋतु अनुभवायला मिळतात. सूर्यानंतर आकाशात सर्वात सहज दिसणारी तसेच आपल्यावर परिणाम करणारी गोष्ट म्हणजे चंद्र. हा चंद्र साधारण २९.५ दिवसात पृथ्वीभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करतो. एका अमावस्ये पासून पुढच्या अमावस्येपर्यंत हे मोजता येते. या गणिताने आपल्या पूर्वजांनी वर्षात १२ मास ठरवले. २९.५ x १२ = ३५४ हे एका चंद्रवर्षाचे दिवस. उरलेले साधारण ११ दिवस भरून काढण्यासाठी दर ३ वर्षांनी एक अधिक महिना आपल्या कालगणनेत योजलेला आहे.

इंग्रजांनी आपले राज्य बळकावल्यावर त्यांनी आपली प्रत्येक गोष्ट नष्ट करायला सुरुवात केली. यात आपण आपले कालमापनही गमावून बसलो. इंग्रजांनी त्यांचे कुठल्याही खगोलीय घटनांवर आधारित नसलेले केवळ ३६५ दिवसांना १२ महिन्यात विभागणारे कालमापन आपल्यावर, तसेच ज्या ज्या ठिकाणी त्यांनी वसाहती (कॉलनीज) केल्या तिथे लादले. यातील अनेक महिन्यांना वेगवेगळ्या राजांची नावे दिली गेली. एक आड एक महिना ३० आणि ३१ दिवसांचा असे ठरलेले असताना काही राजांनी आपापल्या नावांचे महीने ३१ दिवसांचे करून घेतले. (उदाहरणार्थ ऑगस्ट). या कॅलेंडर मध्ये वर्षाची सुरुवात, महिन्याची सुरुवात असं काहीच कुठल्याच खगोलीय घटनांवर आधारित किंवा त्याच्याशी संलग्न नाही. एकूण काय तर कार्यालयीन कामासाठी एक सरधोपट कालगणना म्हणून केवळ हे वापरता येऊ शकतं.

आता जर आपण आपली मराठी कालगणना बघितली तर प्रत्येक मास हा अमावस्येच्या दुसऱ्या दिवशी चालू होतो. आणि पुढील अमावास्येला संपतो. वसंत ऋतु च्या सुरुवातीला आपले वर्ष चालू होते. प्रत्येक मास हा प्रतिपदा ते पौर्णिमा (शुक्ल पक्ष) आणि प्रतिपदा ते अमावस्या (कृष्ण पक्ष) अशा दोन पक्षात (पंधरवड्यात) विभागलेला असतो. यांची नावेही प्रत्येक मासाच्या पौर्णिमेच्या जवळ असणाऱ्या नक्षत्रावरून ठेवलेली आहेत (कुठल्या राजांची नावे नाहीत). ज्यांना आकाशात नक्षत्रे ओळखता येतात त्यांना पौर्णिमेच्या रात्री नुसतं आकाशात बघून मराठी महिना सांगता येतो. अशा कित्येक गोष्टी सांगता येतील. तर अशा शास्त्रशुद्ध कालगणनेला सोडून आज आपण आपल्या घरातही ग्रेगोरियन कॅलेंडर वापरत आहोत. मराठी कॅलेंडर आहेत पण ती सुधा ग्रेगोरियन कॅलेंडर प्रमाणेच मांडली आहेत.

आपल्या पूर्वजांनी केलेला अभ्यास आणि त्यातून निर्माण झालेली खगोलशास्त्रावर आधारित कालगणना घराघरात रूढ व्हावी, प्रत्येक मासातील २ पंधरवड्यांमध्ये केलेली विभागणी आपल्या अंगवळणी पडावी. हळू हळू त्याचे आपल्या आयुष्यातील फायदे सर्वांना कळावे, आपल्या सणांची (आणि त्यांच्या खगोलशास्त्रीय आधाराची) ओळख व्हावी म्हणून ही मराठी दिनदर्शिका आम्ही तयार केली आहे.

- अमित चितळे  (माघ शुक्ल तृतीया शके १९४७ - २० जानेवारी २०२६)

मराठी दिनदर्शिकेच्या या मुख्य पानावर आपले सहर्ष स्वागत आहे!
आपल्या सर्वांच्या उदंड प्रतिसादामुळे दिनदर्शिका छापून व्हायच्या आतच मागच्या वर्षी पेक्षा जास्त नोंदणी झालेली आहे. भिंतीवरील दिनदर्शिका छापून झालेल्या आहेत आणि येत्या २ आठवड्यात त्याचे वितरण चालू राहील.

पुणे कोथरूड येथे राहणाऱ्यांना घरपोच मिळतील. इतर आमच्याकडून स्वत: येऊन घेऊन जाऊ शकता किंवा आम्ही स्पीड पोस्टाने पाठवू.

दिनदर्शिका पाठवल्यावर लगेच त्याच्या स्पीड पोस्ट ची पावती तुम्हाला whatsapp वर मिळेल. ज्यातला नंबर बघून तुम्हाला पोस्टाच्या साइट वर तुमची दिनदर्शिका कुठे पर्यंत पोचली आहे ते समजू शकेल. त्यातच तुम्हाला पोस्टेज ची माहिती ही कळेल. तुम्हाला दिनदर्शिका मिळाल्यावर तुम्ही ते पोस्टेज मला ऑनलाइन पाठवू शकता.

टेबलावरील आणि रोजनिशी स्वरूपातील दिनदर्शिका छपाई अजून चालू आहे आणि ती लवकरच पूर्ण होईल. त्यानंतर त्या ऑर्डर्स चेही वितरण चालू होईल.

- अमित चितळे (पौष कृष्ण षष्ठी शके १९४७ - ८ जानेवारी २०२६)


भिंतीवरची दिनदर्शिका
भिंतीवर लावण्यास उपयुक्त. प्रत्येक तिथीबद्दल विस्तृत माहिती असल्यामुळे अतिशय उपयोगी.
आकार: A3
माहिती: विस्तृत
किंमत: १३० रुपये
सवलतीची किंमत: १०० रुपये (२८ फेब्रुवारी पर्यंत)
टेबलावरची दिनदर्शिका
थोड्याच शिल्लक आहेत
घरी अथवा ऑफिस मध्ये टेबलावर, डेस्क वर ठेवण्यास उपयुक्त. महत्वाचे सण आणि तिथींची माहिती.
यावर्षीच्या टेबल दिनदर्शिकेत नुकत्याच यूनेस्को यादीत अंतर्भाव झालेल्या १२ किल्ल्यांची चित्रे आहेत, जी नक्कीच आपल्या टेबलाची शोभा वाढवतील आणि आपल्याला प्रेरणा देतील.
आकार: 7 x 9.5 inch
माहिती: संक्षिप्त
किंमत: २०० रुपये
सवलतीची किंमत: १६० रुपये (२८ फेब्रुवारी पर्यंत)
दैनंदिनी स्वरूपातील दिनदर्शिका सध्या संपल्या आहेत
सर्व माहिती सकट प्रत्येक दिवसासाठी एक पान. दैनंदिनी (वही) स्वरूपात असल्यामुळे रोजची दैनंदिनी लिहिण्यास अतिशय उपयुक्त. वरील दोन्ही प्रकारात उपलब्ध नसलेल्या काही महत्वाच्या सूचनांचा अंतर्भाव. 
आकार:A5
माहिती: संक्षिप्त. कडेला एक पान दाखवले आहे त्याप्रमाणे प्रत्येक पानावर  डाव्या बाजूला "पुर्वनियोजन (TODO), सामाजिक / राजकीय घडामोडी, आरोग्य विषयक नोंदी, आणि रोख जमाखर्च लिहायला जागा ठेवली आहे. आणि उजव्या बाजूला पूर्ण जागा दैनंदिनी (diary) लिहायला ठेवली आहे.
किंमत: ३०० रुपये
सवलतीची किंमत: २५० रुपये (२८ फेब्रुवारी पर्यंत)

आपल्या संस्थेचे अथवा व्यवसायाचे नाव असलेली आपली मराठी दिनदर्शिका
या वर्षी अधिक महिना आल्यामुळे पहिले संपूर्ण पान आणि बाकी सर्व महिन्यांच्या पानातील वरची आडवी पट्टी येथे आपल्याला आपल्या संस्थेची अथवा व्यवसायाची जाहिरात करता येईल

प्रश्नोत्तरे:

प्रश्न १. मराठी दिनदर्शिका म्हणजे काय?
उत्तर १: इंग्रजी दिनदर्शिका ही जानेवारी महिन्यात चालू होऊन डिसेंबर महिन्यात संपते. परंतु भारतीय हिंदू दिनदर्शिका या चैत्र महिन्यात चालू होऊन फाल्गुन महिन्यात संपतात. ही दिनदर्शिका भारतीय हिंदू दिनदर्शिका आहे. मराठी दिनदर्शिकेतील प्रत्येक महिना २ भागात विभागलेला आहे. पहिला भाग शुद्ध पक्ष आणि दूसरा कृष्ण पक्ष. पहिल्या भागात प्रतिपदा ते पौर्णिमा आणि दुसऱ्या भागात प्रतिपदा ते अमावस्या अशा तिथी आहेत.

प्रश्न २: या मराठी दिनदर्शिकेत इंग्रजी महिन्याच्या तारखा कळतात का?
उत्तर २: ही दिनदर्शिका मराठी असली आणि "जानेवारी ते डिसेंबर" ऐवजी याची मांडणी "चैत्र ते फाल्गुन" अशी असली, तरी आपण नेहेमी वापरतो तशा सूर्यावर आधारित दिवसांप्रमाणे याची रचना आहे, त्यामुळे इंग्रजी महिन्यांच्या तारखा ठळक पणे दिलेल्या आहेत.

प्रश्न ३: या दिनदर्शिकेतील सर्व वेळा कुठल्या ठिकाणाप्रमाणे आहेत?
उत्तर ३: या दिनदर्शिकेतील सर्व वेळा (सूर्योदय-सूर्यास्त, चंद्रोदय-चंद्रास्त, नक्षत्र समाप्ती, पौर्णिमा-अमावस्या आरंभ आणि समाप्ती) या पुणे शहाराप्रमाणे आहेत.

प्रश्न ४: ही दिनदर्शिका कशी विकत घ्यायची? पैसे कुठे आणि कधी भरायचे ? कशी आणि कधी मिळेल?
उत्तर ४: ही दिनदर्शिका विकत घेण्यासाठी ९३५६३४५९०९ या नंबर वर whatsapp मेसेज करावा. डिसेंबर २०२५ च्या आत पैसे भरल्यास सवलत मिळेल (वर दर लिहिले आहेत). पैसे पाठवण्यासाठी amitchitale@icici हा upi id वापरावा. पैसे पाठवल्यानंतर ९३५६३४५९०९ या नंबर वर screenshot पाठवावा. दिनदर्शिकांची छपाई साधारण जानेवारी २०२६ मध्ये होईल. आणि फेब्रुवारी पर्यंत वितरण चालू होईल. पुण्यात कोथरूड भागात घरपोच मिळेल, त्या पेक्षा लांब असेल तर पोस्टाने (speed post) पाठवली जाईल. पोस्टेज आकार अतिरिक्त पडेल. याव्यतिरिक्त आपण स्वतः आमच्याकडे येऊन दिनदर्शिका घेऊन जाऊ शकता

प्रश्न ५: दैनंदिनी मध्ये नक्की काय काय आहे?
उत्तर ५: दैनंदिनी मध्ये "चैत्र शुक्ल प्रतिपदे (१९ मार्च २०२६) पासून फाल्गुन अमावस्ये (६ एप्रिल २०२७) पर्यंत प्रत्येक दिवसाचं एक पान आहे. याशिवाय काही माहितीदेणारी पाने आहेत. ज्यात नहमीची स्तोत्रे आहेत, आरत्या आहेत. महिन्याची आखणी करण्यासाठी पाने आहेत. वर्षाचा आढावा घेण्यासाठी वेगळे पान आहे. वर्षभराच्या महत्वाच्या सणांच्या तारखा आहेत.

या दिनदर्शिकेच्या अनुषंगाने भारतीय सणवार, भारतीय कालगणना, भारतीय कालगणना आणि पाश्चात्य कालगणनेतला फरक, ऋतुनुसार आचार विचार अशा गोष्टी इथे लवकरच बघायला मिळतील.


- अमित चितळे (९३५६३४५९०९)
chitale.amit@gmail.com